Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

गाढवाचा गैरसमज
ऐक्य समूह
Tuesday, December 31, 2013 AT 11:22 AM (IST)
Tags: bd1
एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तींना नमस्कार करीत. पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तींना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वत:ला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना. बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका हाणत पाथरवटा म्हणाला, "प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मूर्खा, लोक नमस्कार त्या मूर्तींना करताहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील.' तात्पर्य : खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येतेच.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: