Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

दोन कोल्हे
ऐक्य समूह
Wednesday, January 01, 2014 AT 11:13 AM (IST)
Tags: bd1
एकदा दोन कोल्ह्यांनी कोंबड्याच्या खुराड्यात शिरण्याची एक युक्ती योजली व ती लगेच अंमलात आणली. खुराड्यात प्रवेश होताच कोंबड्या व त्यांची पिले यांना मारून खाण्याचा त्यांनी सपाटा चालविला. त्या कोह्यांपैकी एक कोल्हा तरुण व अविचारी होता. त्याचे मत असे झाले, की सगळ्या कोंबड्या लगेच मारून खाव्यात. दुसरा म्हातारा कोल्हा अनुभवी असल्याने त्याने असे ठरविले, की काही कोंबड्या दुसऱ्या दिवसाकरता राखून ठेवाव्यात. तो तरुण कोल्ह्यास म्हणाला, मुला, मी अनुभवाने शहाणा झालो आहे अन्‌ या जगात कितीतरी अकल्पित गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत. तेव्हा आजच हा खाण्याचा साठा न संपवता त्याचा काही भाग शिल्लक ठेवावा हे चांगलं.' त्यावर तरुण कोल्हा म्हणाला, "तू म्हणतोस ते खरे, पण माझा तर असा निश्चय आहे, की पुढल्या आठ दिवसांचं खाणं आजच एकदम खऊन टाकावं. कारण या कोंबड्यांचा मालक इथे आता पहारा करत बसेल अन्‌ आम्हाला पकडून आमचा जीव घेईल. तर अशा वेळी पुन: येथे येण्याच्या भानगडीत पडणं वेडेपणाचं नाही काय?' आपले मत सांगून तो त्याप्रमाने वागू लागला. तरुण कोल्ह्याने इतक्या कोंबड्या खाल्ल्या, की त्याचे पोट फुगून फुटले व तो मरण पावला. म्हाताऱ्या कोह्याने एकदोन कोंबड्या खाऊन दुसऱ्या दिवशी पुन: येण्याचे ठरविले. दुुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी आला असता कोंबड्यांच्या मालकाने त्याला पकडले व ठार केले.         
तात्पर्य   तरुण लोक अधाशीपणामुळे तर म्हातारे लोक लोभामुळे दु:ख भोगतात.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: