Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

गर्विष्ठ मेणबत्ती
ऐक्य समूह
Monday, January 06, 2014 AT 11:30 AM (IST)
Tags: bd1
एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श़ेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?' तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.
© Copyrights 2013 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: