Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन
ऐक्य समूह
Monday, May 15, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: na4
राजौरी सेक्टरमध्ये गोळीबार; तोफांचा मारा
5 श्रीनगर, दि. 14 (वृत्तसंस्था) : नियंत्रण रेषेवर राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केल्यानंतर पाक सैन्याने पुन्हा राजौरी सेक्टरमध्ये रविवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैन्याने स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केला. यावेळी पाकिस्तानने पीर बादेसार, नौशेरा, मेंढर येथील बालाकोट सेक्टर-मधील तारकुंडीपर्यंतच्या सीमा भागाला लक्ष्य केले. या गोळीबारात भारतीय बाजूकडील कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमीझाले नाही. राजौरी आणि नौशेरा सेक्टर यांच्यामध्ये तारकुंडी असून तेथे भारतीय लष्कराच्या दोन किंवा तीन चौक्या आहेत. या ठिकाणी पाक सैन्याने उखळी तोफांचा मारा केला, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिली.
पाक सैन्याने नियंत्रण रेषेवर राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शनिवारी केलेल्या गोळीबार आणि उखळी तोफांच्या मार्‍यात दोन नागरिक ठार तर भार-ताच्या चार जवानांसह सात जण जखमी झाले होते.गेले काही दिवस पाककडून नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू आहे. त्यामुळेसीमेजवळच्या दोनशे ते तीनशे घरांचे नुकसान झाले असून तेथील एक हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.  
 राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या जवळ असलेल्या शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही जम्मू-काश्मीर सरकारने दिले आहेत.या पार्श्‍वभूमीवर नौशेरा सेक्टरमधील गोळीबार शनिवारी रात्री काही वेळ थांबला होता. त्यामुळे नियंत्रण रेषेवर काही वेळ शांतता होती. मात्र, पाक सैन्याने पुन्हा राजौरी जिल्ह्यातील राजौरी सेक्टरमध्ये रविवारी सकाळी गोळीबार आणि 82 एमएम व 120 एमएम उखळी तोफांचा मारा केला. त्याला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले, असे लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: