Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ना. जानकर यांच्याकडून सुंबरान शेळी प्रकल्पाची पाहणी
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re4
5वाई, दि. 16 ः कवठे (ता. वाई) येथील पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुंबरान शेळी प्रकल्पाची पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी पाहणी करून उच्चशिक्षित तरुणांनी नोकर्‍यांच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत, आपल्या ज्ञानाचा उपयोग व्यवसायासाठी व समाजासाठी करावा, चव्हाण यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.
शासनाच्या मदतीची वाट न पाहता चव्हाण यांनी शेळ्यांमध्ये अनुवंशिक सुधारणा करून शेतकर्‍यांना जातिवंत शेळ्यांची उपलब्धता आणि मार्गदर्शन केल्याची दखल पशुसंवर्धन विभागाने घेतल्याचे जानकर यांनी नमूद केले. शेळ्यांसाठी बेडरूम, डायनिंग रूम या नावीन्यपूर्ण कल्पनेचे त्यांनी कौतुक केले. चव्हाण यांनी शेळी व्यवस्थापनासह विविध प्रयोगांची माहिती दिली. सहआयुक्त डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी बोकडांच्या फॅशन शोसंबंधी माहिती दिली. उपायुक्त डॉ. विनोद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी बी. एस्सी. अ‍ॅग्री ही पदवी मिळवल्यानंतर अनेक नामवंत कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले; परंतु आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या लोकांसाठी व्हावा, या हेतूने त्यांनी गावी सुंबरान शेळीपालन प्रकल्प सुरू केला असून त्यात ते यशस्वी झाल्याचे सांगितले. डॉ. कविता खोसे, ज्ञानदीप के्रडिट सोसायटीचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत ढमाळ यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. नंदराज भोसले, बाळासाहेब घाडगे, विश्‍वास चव्हाण, राजेंद्र यादव, बाळासाहेब जगताप, मानसिंग चव्हाण, शंकर कदम, संभाजी चव्हाण, हिंदुराव चव्हाण, सुरेश चव्हाण, कवठे, विठ्ठलवाडी, पांडे, वहागाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: