Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मान्सून चाहुलीने ‘सेन्सेक्स’ची भरारी
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: mn3
निफ्टीचीही 9500 च्या पल्याड उसळी
5 मुंबई, दि. 16 (वृत्तसंस्था) : देशात यंदा दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज आणि जागतिक शेअर बाजारांमधून मजबूत संकेत मिळाल्याने निफ्टीने प्रथमच मंगळवारी 9500 चा आकडा पार केला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीने 62 अंशांची उसळी म्हणजे 0.65 टक्क्यांची वाढ नोंदवली. निफ्टी 9.507.40 अंशांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही 244.97 अंशांची उसळी घेतली. सेन्सेक्स 0.80 टक्क्यांनी वाढून 30,567.09 अंशांवर बंद झाला.
शेअर बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेमुळे बाजारात दिवसभराच्या व्यवहारात जोरदार खरेदी झाली. मागील पाच सत्रांमध्ये सेन्सेक्सने जबरदस्त उसळी घेतली होती. मुंबई शेअर बाजार 30,000 अंशांच्या पुढे पोहोचला होता. सेन्सेक्सच्या निर्देशांकाने मंगळवारी पुन्हा नव्या शिखरावर झेप घेतली. केरळमध्ये मान्सूनचे दोन दिवस आधीच आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविल्यानंतर बाजारात जोमाने खरेदी झाली. त्यामुळे शेअर बाजाराने 244.97 अंशांची उसळी घेतली. दिवसअखेर शेअर बाजार 30,567.09 अंशांवर बंद झाला. निफ्टीनेही दिवसभराच्या व्यवहारात 62 अंशांची वाढ नोंदवली. निफ्टी निर्देशांक 9507.40 अंशांवर बंद झाला.
मान्सून दोन दिवस आधीच भारतात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस होईल, अशी गुंतवणुकदारांना अपेक्षा आहे. त्यात मान्सूनवर अल-निनोचे सावटही कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात जोमात खरेदीचे व्यवहार होऊन सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली. तत्पूर्वी पहिल्या तासाभरात सेन्सेक्सने 122 अंकाची वाढ नोंदवून 30,513 पर्यंत मजल मारली होती. आयटी कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी दिसली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही 9,500 चा आकडा पार केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: