Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोल्हापूर परीक्षेत्रातील 10 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: lo3
5 सातारा, दि. 16 : कोल्हापूर परीक्षेत्रातील 10 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केल्या असून त्यातील तीन बदल्या विनंती बदल्या आहेत. त्यातील काही बदल्या एका जिल्ह्यात चार वर्षाचा सर्वसाधारण कालावधी पूर्ण केल्याने करण्यात आल्या आहेत.
विनंती बदल्या पुढीलप्रमाणे (कंसात नवीन नेमणुकीचे ठिकाण)- धन्यकुमार चांगदेव गोडस, कोल्हापूर (पुणे ग्रामीण), संजय महादेव गिड्डे, सातारा (सांगली-अकार्यकारी पदावर), बी. आर. पाटील, सातारा (पुणे ग्रामीण).
चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने करण्यात आलेल्या बदल्या (कंसात नवीन नेमणुकीचे ठिकाण)- दादासाहेब बाबूराव चुडाप्पा, सांगली (सातारा), प्रदीपकुमार ज्ञानेश्‍वर जाधव, सांगली (सातारा), रवींद्र चंद्रराव पिसाळ, (सातारा) सांगली, शिवाजी मुरलीधर सोनावणे, सोलापूर ग्रामीण - मुदतवाढ, रवींद्र धैर्यशील शेळके, सोलापूर ग्रामीण (सांगली), शिवाजी बाबूराव देवकर, पुणे ग्रामीण- मुदतवाढ, नारायण मोहन सारंगकर, पुणे ग्रामीण (सातारा).
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: