Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चाकूचा धाक दाखवून लुटमार; डॉक्टरची पत्नी गंभीर जखमी
ऐक्य समूह
Wednesday, May 17, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: lo4
5 सातारा, दि. 16 : घरात घुसून डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून घरातील दोन हजार रुपयांची रोकड घेवून एका संशयिताने पलायन केले. त्यावेळी डॉक्टरच्या पत्नीने आणि मुलीने आरडाओरडा केला आणि संशयिताला पकडण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये पत्नीला चाकू लागला असून ती गंभीर जखमीझाली आहे.
याबाबत डॉ. विलास फडतरे (वय 61, रा. सदरबझार, सातारा) यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपी रोहित जालिंदर लवळे (रा. आझादपूर, ता. कोरेगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 11 रोजी रात्री 11.15 ते 11.30 च्या दरम्यान डॉक्टरांच्याघराची बेल एकाने वाजवली. त्यावेळी त्यांनी काय काम आहे, अशी विचारणा केली. त्यावर दार उघडा, रुग्ण आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांच्या पत्नीने दरवाजा उघडला. त्यावेळी तो त्यांना धक्का देत घरात घुसला आणि त्याने डॉक्टरांच्या गळ्याला चाकू लावला. त्यानंतर त्याने घरातील दागिने आणि रोकड देण्यास सांगितले. दरम्यान डॉक्टरांच्या पत्नीने आणि मुलीने गोंधळ केला. त्यावेळी इतरही शेजारी तिथे आले. त्यादरम्यान त्याने पळ काढला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित तपासात पोलिसांना निष्पण्ण झाला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: