Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सदनिकेचा ताबा न मिळाल्याने कराड येथे बिल्डरांविरुध्द तक्रार
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि.17 : साठेखतातील तरतुदीप्रमाणे ठरलेल्या वेळेत सदनिकेचा ताबा न दिल्याने श्र्ी सिद्घनाथ कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांच्यावतीने बांधकाम व्यावसायिक सुधाकर यशवंत बडेकर, मंगेश यशवंत बडेकर (दोघेही रा. श्र्ीरामनगर, कार्वे नाका, कराड), रविराज दिलीपसिंह डुबल, ऋतुराज दिलीपसिंह डुबल (रा. गोळेश्‍वर, ता. कराड) या बांधकाम व्यावसायिकांविरुध्द धनंजय कोळी (आगाशिवनगर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन चौघांवर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस अ‍ॅक्ट 1963 मधील कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू होती.
कराड शहर पोलीस ठाण्यात धनंजय मधुकर कोळी (सध्या रा. आगाशिवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, की श्र्ी सिद्घनाथ कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड डेव्ह-लपर्स यांच्यावतीने बांधकाम व्याव-सायिक सुधाकर यशवंत बडेकर, मंगेश यशवंत बडेकर (दोघेही रा. श्र्ी रामनगर, कार्वेनाका, कराड), रविराज दिलीपसिंह डुबल, ऋतुराज दिलीपसिंह डुबल (रा. गोळेश्‍वर, ता. कराड) यांनी गोळेश्‍वर हद्दीतील भूमापन क्रमांक 136।1 प्लट नं. 3,4,5 मध्ये आर्टिस्ट टावर नावाच्या बहुमजली इमारतीतील सी विंग मधील सदनिका क्र. 4 ही 2010 पासून दि. 29 सप्टेंबर 2013 अखेरपर्यंत साठेखतातील तरतुदीप्रमाणे ताब्यात देणे गरजेचे होते. फिर्यादी धनंजय कोळी यांनी साठेखतात ठरलेल्या रक्कमेपैकी 85 टक्के रक्कम अदा करूनही आजपर्यंत सदनिकेचा ताबा दिलेला नाही. सदनिकेचे खरेदीपत्र न करताबांधकाम अर्धवट ठेवले आहे त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होऊन  कुटुंबास मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर सदनिका ताब्यात न दिल्याने व दिलेल्या रकमेवर दंड 24 टक्के न देता संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस अ‍ॅक्ट 163 मधील कलम 3 च्या अनुषंगाने फसवणूक केल्याचे कोळी यांनी म्हटले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: