Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शाहूपुरी ग्रामपंचायतीसाठी तीन पॅनेल रिंगणात
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: lo3
सत्ताधारी, विरोधी पॅनेलमध्ये बंडखोरी; भाजप रिंगणात, अपक्षांचीही मोर्चेबांधणी
5 सातारा, दि. 17 : सातारा तालुक्यातील शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तीन पॅनेल रिंगणात उतरली आहेत. या निवडणुकीसाठी भाजपही रिंगणातउतरला असून अपक्षांनीही मोर्चेबांधणी केली आहे. यापूर्वीच्या सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरीझाली आहे. शाहूपुरीसाठी अर्ज भरलेल्या 72 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 54 उमेदवार रिंगणात राहिले आहेत
दरम्यान, शाहूपुरीप्रमाणेच खिंडवाडी ग्रामपंचायतीसाठी बहुरंगी लढत होणार असल्याचे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर स्पष्ट झाले. खिंडवाडीसाठी अर्ज भरलेल्या 32 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने 25 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. वेळे, सोनगाव संमत निंब, निनाम, लिंबमधील पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून वाढे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी 9 पैकी 5 जणांनी माघार घेतल्याने 4 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
शाहूपुरीसाठी रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे वॉर्ड नं. 1- अनिता जांभळे, धनश्री ग्रामोपाध्ये, निर्मला सांगलीकर, योगेश साळुंखे, रमेश धुमाळ, प्रणव सावंत, सुदाम चव्हाण, विमल शेडगे, संदीप शिंदे, कृष्णा झोरे, रियाज नदाफ, सचिन दीक्षित, सिध्दार्थ गोसावी, राजेंद्र गिरीगोसावी. वॉर्ड नं. 2 - रेश्मा गिरी, माधवी शेटे,  भाग्यश्री तागडे, राजेंद्रकुमार मोहिते, मधुकर जाधव, मिलिंद चव्हाण. वॉर्ड नं. 3 - शिवप्रसाद वाघमोडे, सतीश कदम, नवनाथ जाधव, सारिका पवार, मुग्धा पुरोहित, संगीता फल्ले, शोभा केंडे, संगीता शिंदे, तृप्ती कडव, वॉर्ड नं. 4 - पूजा कांबळे, स्वाती गायकवाड, सुजाता कांबळे, अमृता प्रभाळे, पूनम जाधव, मयुरा कुलकर्णी, राहुल रेवले, सुहास वहाळकर, अभय घोडके, वॉर्ड नं. 5 - स्वाती नायकवाडी, लीलाबाई शितोळे, नीलम देशमुख, उषा तोरसकर, आशा गुजर, मारुती वाघमारे, शशिकांत इंदलकर, महेश पवार, सुधाकर यादव, वॉर्ड नं. 6- संतोष किर्दत, शंकर किर्दत, भारती जगताप, लता राजपुरे, गणेश आरडे, विक्रांत भोसले, नंदकुमार गायकवाड.
खिंडवाडी ग्रामपंचायतीसाठी रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग 1- संगीता साबळे, सुभाष घाडगे, नितीन काळे, लता जाधव, शशिकांत पवार, रजनी साखरे,  दादासो घाडगे, परमेश्‍वर यादव, सीमा कुडाळकर, प्रभाग 2- अशोक पवार, दिलीप वाघ, विजया येवले, अमर पवार, शीतल सावंत, रजनी साखरे, प्रभाग 3- गुरुप्रसाद चव्हाण, शारदा यादव, उमेश मोहिते, संजय चोरगे, प्रकाश गुंजावळे, अभिजित जाधव, संतोषकुमार यादव, वनिता यादव. प्रभाग 4- लक्ष्मण घनवट, सागर आगरखेड.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: