Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:08 AM (IST)
Tags: lo1
5 सातारा, दि. 17 : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे उद्या, दि. 18 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्याहस्ते सायंकाळी 7 वाजता जिल्हाधि-कारी कार्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, दि. 18 रोजी दुपारी मुंबईहून हेलिकॉप्टरने सातार्‍यात येणार आहेत. सायंकाळी 5.40 वाजता पोलीस परेड ग्राऊंडवरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे.  5.45 वाजता ते मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करणार असून 5.50 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे. तेथून ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून सायंकाळी 7 वाजता त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 7.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर रात्री 8.45 वाजता शासकीय विश्रामगृहात जाणार असून तेथे त्यांचा मुक्काम आहे. या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री विजय शिवतारे व सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हेदेखील सहभागी होणार आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: