Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोगस कर्जप्रकरणातील आणखी दोन माजी संचालकांना जामीन मंजूर
ऐक्य समूह
Thursday, May 18, 2017 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 17 : कृष्णा कारखान्यामधील कथीत बोगस कर्ज प्रकरणी अटकेत असलेल्या माजी संचालकांपैकी सर्जेराव लोकरे व उदय शिंदे या आणखी दोन संचालकांना बुधवारी जामीन मंजूर झाला. यापूर्वी मंगळवारी दोन जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. आता उर्वरित चार माजी संचालकांच्या जामिनावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कृष्णा कारखान्यातील कथीत बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरुन माजी  चेअरमन अविनाश मोहिते व माजी व्हाईस चेअरमनसुरेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 15 एप्रिल रोजी पोलिसांनी या प्रकरणी कराडसह वाळवा तालुक्यातील माजी संचालकांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकून आठ संचालकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर संबंधितांवर अटकेची कारवाईही करण्यात आली.  त्यापैकी संभाजी जगताप व बाळासाहेब निकम या दोघांना मंगळवारी 50 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्यात आले. त्यानंतर आज सहा माजी संचालकांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी सर्जेराव लोकरे व उदय शिंदे यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता गुरुवार, दि. 18 रोजी चार जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: