Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मेढ्याच्या नगराध्यक्षांच्या शर्यतीत शिवसेनेच्या द्रौपदा मुकणे बिनविरोध
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: re3
5मेढा, दि. 18 : मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून प्रभाग 3 कडे सवार्र्ंचे लक्ष लागले होते. या प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सौ. रूपाली जोशी यांनी तर शिवसेना व इतर मित्र पक्षांकडून सौ. द्रौपदा मुकणेे व हौशा मुकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या सौ. जोशी यांनी तर शिवसेनेच्या हौशा मुकणे यांनी आपले उमेवारी अर्ज मागे घेतल्याने अनुसूचित जाती जमातीच्या सौ. द्रौपदा मुकणे मेढा नगरीच्या पहिल्या नगराध्यक्षा होणार आहेत. त्यांच्या निवडीची औपचारिकताच बाकी आहे.
सहा महिन्यांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग तीनमधून सौ. रेश्मा दीपक मुकणेे यांनी अपक्ष व हौशा जाणू मुकणेे यांनी राष्ट्रवादी तर्फ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी दरम्यान अ‍ॅड. नवनाथ देशमुख यांनी नगराध्यक्षपदाच्या सौ. रेश्मा मुकणे यांचा अर्ज अपत्यांचे कारण देवून अपात्र ठरविला होता. त्यामुळे हौशा मुकणेे या राष्ट्रवादीच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या. परंतु राष्ट्रवादीने माझी फसवणूक केल्याचा व माझ्या सहीचा खोटा वापर केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर त्यांनी परस्पर जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागली.
या पोट निवडणुकीसाठी प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून सौ. रुपाली गणेश जोशी यांनी तर शिवसेनेकडून सौ. द्रौपदा हौशा मुकणे यांनी अर्ज दाखल केले होते. 
हौशा जाणू मुकणे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. दि. 6 मे रोजी झालेल्या अर्जांच्या छाननी दरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ. रुपाली जोशी यांनी हौशा मुकणेे व सौ. द्रौपदा मुकणे यांच्या उमेदवारी प्रतिज्ञापत्रावर हरकती नोंदवल्या. त्या हरकती निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी पाटील यांनी फेटाळून लावल्या. या विरोधात सौ. जोशी सातारा जिल्हा न्यायालयात गेल्या होत्या. सौ. जोशी यांच्या अपिलावर जिल्हा न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन तेथेही न्यायालयाने त्यांचे अपिल फेटाळून लावत दोन्ही अर्ज वैध ठरविले.
सातारा येथील जिल्हा न्यायालयात आलेले अपयश पचविता न आल्याने अखेर आज राष्ट्रवादी पक्षाने आपल्या उमेदवार सौ. रूपाली जोशी यांचा अर्ज माघारी घेऊन निवडणुकीअगोदर पराभव मान्य केल्याची चर्चा सुरू आहे. अपक्ष उमेदवार हौशा मुकणे यांनीही आपला अर्ज मागे घेतला. शिवसेना व मित्र पक्षांनी फटाक्यांची आतषबाजी करत
मिरवणूक काढली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: