Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाबळेश्‍वर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी कुंभारदरे, व्हा. चेअरमनपदी बावळेकर
ऐक्य समूह
Friday, May 19, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: re1
5महाबळेश्‍वर, दि. 18 : महाबळेश्‍वर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी जन महाबळेश्‍वर अर्बन परिवार पॅनेलचे  राजेश उर्फ बंडा कुंभारदरे तर व्हाईस चेअरमनपदी याच पॅनेलचे सी. डी. बावळेकर  बिनविरोध निवडून आल्याचे अध्यासी अधिकारी सौ. शिल्पा कडू यांनी जाहीर केल्यावर उपस्थितांनी त्यांचे टाळ्या  वाजवून अभिनंदन केले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कदम, बँकेचे व्यवस्थापक उमेश बगाडे तसेच जन महाबळेश्‍वर अर्बन परिवार पॅनेलचे नूतन संचालक बाळकृष्ण कोंढाळकर, दत्तात्रय वाडकर, दिलीप रिंगे, समीर सुतार, सचिन धोत्रे, युसूफ शेख, बाबू कात्रट, नंदकुमार वायदंडे, संचालिका सौ. संगीता तोडकर व जावेद वलगे हे उपस्थित होते.
दि महाबळेश्‍वर अर्बन बँकेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी गुरुवारी निर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार बोलावण्यात आली होती. या निवडीसाठी त्यांनी अध्यासी अधिकारी म्हणून सौ. शिल्पा कडू यांची नियुक्ती केली होती. पहिल्यांदा चेअरमनपदासाठी राजेश कुंभारदरे यांचा त्यानंतर व्हाईस चेअरमनपदासाठी सी. डी. बावळेकर यांचा अर्ज भरण्यात आला. 
संचालक मंडळाच्या बैठीकीत दोन्ही निवडी बिनविरोध करण्याचे एकमताने ठरवण्यात आल्याने कुंभारदरे व बावळेकर यांची बिनविरोध निवड झाली.
मावळते चेअरमन बाळासाहेब कोंढाळकर व मावळते व्हाईस चेअरमन बाबूराव कात्रट यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर राजेश कुंभारदरे व सी. डी. बावळेकर यांचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते डी. एम. बावळेकर, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, माजी नगरसेवक संतोष आबा शिंदे, हॉटेल व्यावसायिक व उद्योजक गिरीश नायडू, महाबळेश्‍वर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार दस्तुरे, अजय तोडकर, अरुण बावळेकर, अ‍ॅड. संजय उर्फ बाळासाहेब साळुंखे, हेमंत उर्फ सोनू साळवी, सलीम बागवान, प्रमोद लोखंडे, संदीप   अक्षनतल, माजी संचालक मनोज ताथवडेकर, सुनील यादव, गोपाळ लालबेग, जयवंत वाईकर, शिवसेना शहराध्यक्ष विजय नायडू, काळी-पिवळी टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, शिवसैनिक आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.  

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: