Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

मातृभाषेचे महत्त्व
vasudeo kulkarni
Thursday, July 13, 2017 AT 11:40 AM (IST)
Tags: vc1
एकदा सरदार वल्लभभाई पटेल आपला मुलगा, सून व नातूसह महात्मा गांधींना भेटण्यास गेले होते. ते जेव्हा गेले तेव्हा गांधीजी जेवायला बसले होते. लहान मूल पाहताच त्याला गांधीजींनी एक गाकर दिला. पण त्या बाळाच्या आईनं त्याच्या हातातून तो एकदम खेचून घेतला अन् ती त्याला म्हणाली, ‘आधी थँक यू म्हण’ पण ते लहान मूल काही ‘थँक यू’ म्हणेना. आईनं त्याला पुन्हा पुन्हा बजावलं, ‘थँक यू’ म्हण आधी, तरच देईन गाकर.’ शेवटी आपल्या बोबड्या बोलीत तो रागारागानं म्हणाला, ‘ठेंकू !’ हा तमाशा केव्हा संपतो त्याची गांधीजी वाटच पाहात होते. ते त्या बाळाच्या आईला म्हणाले, समुद्रालाच आग लागली तर सांगायचं कुणाला? तो एक दैवी कोपच समजायचा ना?’ त्या बाईला काही गांधीजींचं म्हणणं उमजेना पण तिच्याजवळ असलेली दुसरी एक भगिनी म्हणाली, ‘अहो, मुलाला तुम्ही गुजरातीऐवजी इंगˆजीत ‘थँक यू’ म्हणायला शिकवलंय ना, त्याच्यावर ही टीका आहे बापूंची !’ त्यावर गांधीजी म्हणाले, ‘छे, छे मी टीका नाही करीत पण परभाषेच्या गुलामीचं विष किती खोल गेलंय याचा विचार करतो. ही मुलगी तर सरदार वल्लभभाईंची अर्थात एका देशभक्ताची सून. माझ्या दृष्टीनं हिला बिचारीला इंगˆजीचं फारसं ज्ञान नाहीच पण तरीसुद्धा आपल्या मुलाला इंगˆजी शब्द शिकवायचा तिचा असा दुरागˆहच असल्यावर कुणाला बोल लावायचा !’ ते पुढे म्हणाले, ‘जर आमच्या माताच हा भाषेचा गुंता उकलू शकल्या तर आपण मात्र इंगˆजीच्या बेडीतून मुक्त होऊ अन् मातृभाषा किंवा राष्ट्रभाषा यांचा विकास करू शकू.’ कथा उपदेश : इंगˆजीचे महत्त्व वाढते असले तरी मातृभाषा कमी महत्त्वाची नाही. तिचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: