Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

अविश्‍वासाचं फळ
ऐक्य समूह
Tuesday, July 18, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: vc1
गावातल्या एका माणसाचा कुत्रा मोठा गुणी, इमानी होता. सर्व गावाचं रक्षण करीत असे. काही कारणांनी त्या माणसाला आपला कुत्रा सावकाराला विकावा लागला. एक रात्री सावकाराच्या घरी चोर आला. पैशाची थैली घेऊन पळून जाणार्‍या चोराला कुत्र्यानं पाठलाग करून धरले व त्याचा कडकडून चावा घेतला. दुसर्‍या दिवशी सावकाराचा धोतराचा सोगा तोंडात धरून ओढत त्यानं सावकाराला त्या पडक्या विहिरीपाशी नेलं. तिथं चोरानं पैशाची थैली टाकली होती. सावकाराला फार आनंद झाला. त्यानं कुत्र्याचं कौतुक केलं आणि त्याला त्याच्या पहिल्या धन्याकडे पाठवलं. त्याच्या गळ्यात एक चिठ्ठी लिहिली, ‘हे जनावर अत्यंत इमानी आहे. तुमचा आधार आहे. त्याला परत पाठवीत आहे.’ कुत्रा घरधन्याकडे गेला. त्याला परत आलेला पाहताच धन्याच्या मनात अनेक शंका आल्या. त्याला वाटलं, ‘हा इमानी म्हणवणारा कुत्रा सावकाराचं दार सोडून माझ्याकडे कसा आला.’ त्यानं कुत्र्याच्या डोक्यावर काठीनं प्रहार केला. ते जनावर मरून पडलं. पाहतो तो त्याच्या गळ्यात होती चिठ्ठी. ती वाचताच सारा उलगडा झाला. अविश्‍वास आणि उतावीळपणाचं फळ मिळालं.
कथा उपदेश : अविश्‍वास घातक ठरतो.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: