Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

पैशाने समाधान नाही
ऐक्य समूह
Friday, July 21, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: vc1
ब्र्रह्मज्ञानी आज्ञवलक्य सधन गृहस्थाश्रमी होता. त्याला दोन बायका होत्या. एकीचे नाव मैत्रेयी व दुसरीचे नाव कात्यायनी. एके दिवशी याज्ञवलक्याने मैत्रेयीला हाक मारली व तो तिला म्हणाला, ‘मैत्रेयी ! मी आता संन्यास घेणार आहे. म्हणून तू आणि कात्यायनी दोघींमध्ये माझ्या संपत्तीची वाटणी करून देतो.’ कात्यायनी संसारी वृत्तीची साधी बायको होती. मैत्रेयी अध्यात्मवृत्तीची बायको होती. तिला पतीच्या संपत्तीची वाटणी हवी होती. परंतु या नश्‍वर संपत्तीची नको होती. तिला खरे समाधान देणार्‍या ब्रह्मविद्येची संपत्ती पाहिजे होती. ती पवित्र संपत्ती याज्ञवलक्यपाशी आहे हे तिला माहीत होते. तिने पतीला विचारले, ‘हे भगवन पृथ्वीच्या मोलाइतके द्रव्य जर मला मिळाले. तर मी मुक्त होईन का?’ याज्ञवलक्याने तिला उत्तर दिले, ‘मैत्रेयी, तू म्हणतेच ते खरे आहे. द्रव्याने अमृत मिळत नाही. यावर मैत्रेयी म्हणाली, ‘द्रव्याने जर अमृतत्व मिळत नाही तर ते घेऊन मी काय करू? अमृतत्व कसे मिळेल ते मला सांगा.
‘याज्ञवलक्य प्रसन्न होऊन म्हणाला, ‘मैत्रेयी, तू अत्यंत प्रिय भाषण करीत आहेस. ये बैस. ते ज्ञान तुला मी सांगतो.’ अखेर आपला आत्मा हाच समाधानाचे व प्रेमाचे मूलस्थान आहे असे सांगून त्या आत्म्यालाच पाहण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याविषयीच ऐकावे. चिंतन करावे आणि त्याचाच ध्यास लावून घ्यावा. कारण त्याचे ज्ञान झाले, की सर्व जगाचे ज्ञान होते.’ असे याज्ञवलक्य म्हणाला. पैसा मोठा धोका देतो. व्यवहाराला तो अवश्य लागतो. पण त्याचा आधार वाटतो. त्यामुळे त्याचे प्रेम ईश्‍वरदर्शनाच्या आड येते.
कथा उपदेश : पैशाचे प्रेम नसणे ही खरी संताची हृदयातील खूण आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: