Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

कष्टाचे महत्त्व
ऐक्य समूह
Thursday, July 27, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: vc1
एका नगरीत एक धनिक राहात होता. त्याला पाच मुले होती. त्या सर्वांची त्याने लग्ने केली. पहिल्या चारही भावांच्या बायका घरकामात आळशी होत्या. कामावरून त्यांच्यात भांडणे होत असत. पाचवी सून गरीब घरातील व सुशिक्षित होती. तिने आल्याबरोबर पाहिले, की घरकाम करायला कोणीही पुढे येत नाही. ती रोज पहाटे उठून सर्व घरकाम करू लागली. स्वादिष्ट भोजन बनवून सर्वांना जेवायला वाढून मग स्वत: जेवू लागली. त्यामुळे सासू तिच्यावर खूश झाली. सासू तिला म्हणाली, ‘तुला एकटीलाच सर्व काम करावे लागते म्हणून तुला राग येत नाही का? तेव्हा ती म्हणाली, ‘सासूबाई कामाने काही कोणी मरत नाही. उलट चांगला व्यायाम होतो व शरीर निरोगी राहते. स्वत:च्याच घरचे काम करण्यात लाज कसली? हे सर्व जावांनी ऐकले व लज्जेने त्यांची मान खाली गेली. तेव्हा त्यांना समजले, की घरचे काम सगळ्यांनी मिळून केले तर घरात आणखीनच आनंद निर्माण होईल.
कथा उपदेश : स्वत:च्या उदाहरणाने आदर्श निर्माण करता येतो.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: