Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केसरकर पेठेतील खून प्रकरणातील तपास ‘जैसे थे’
ऐक्य समूह
Saturday, August 05, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 4 : केसरकर पेठेत बुधवारी रात्री   झालेल्या खून प्रकरणातील संशयितांचे धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. संशयिताचा शोध लवकरच घेतला जाईल, असा विश्‍वास पोलीस व्यक्त करत आहेत. मात्र तपासकार्यात अजून काहीच प्रगती झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, केसरकर पेठेत आशा खैरमोडे (वय 67) यांचा डोक्यात वरवंटा घालून बुधवारी खून झाला.  या घटनेमुळे सातार्‍यात वृद्धांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. काही संशयितांची धरपकडही केली. मात्र अजूनही त्यातून काहीही हाती लागलेले नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: