Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोरेगाव तालुक्यातील बेकायदा वाळू वाहतुकीवर
vasudeo kulkarni
Monday, August 07, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: re2
प्रांतांच्या पथकाची कारवाई, सव्वा चार लाखांचा दंड
5कोरेगाव, दि. 6  : वाठार स्टेशन परिसरात रात्री व पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या बेकायदा वाळू वाहतुकीवर प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांच्या पथकाने रविवारी पहाटे कारवाई केली. दोन डंपर व एक ट्रक या कारवाईत सापडला असून ते वाठार स्टेशन पोलिसांकडे सोपविण्यात आले आहेत. तीन्ही वाहनधारकांकडून सुमारे सव्वा चार लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
प्रांत सौ. नलावडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महसूल विभागाला शिस्त लावली आहे. कार्यालयीन कामकाजाबरोबरच त्यांनी अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई सुरू केली आहे. आदर्की फाटा-वाठार स्टेशन परिसरात रविवारी पहाटे त्यांनी स्वत: ही कारवाई करत दोन डंपर व एक ट्रक जप्त केला. वाठार स्टेशन पोलीस ठाण्याकडे ही वाहने सोपविण्यात आली आहेत. या कारवाईत 4 लाख 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. या मोहिमेत नायब तहसीलदार विठ्ठल काळे, अव्वल कारकून अजित शेंडे, लिपिक घनश्याम यादव, चालक श्रीधर कांबळे हे सहभागी झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: