Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

साधुचा धर्म
ऐक्य समूह
Monday, August 14, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: vc1
रामकृष्ण परमहंस यांची ही गोष्ट. रामकृष्ण परमहंस हे एके सकाळी नदीत स्नानाला गेले होते. स्नान करून सूर्याला अर्ध्य देण्यासाठी त्यांनी ओंजळत पाणी घेतले तेवढ्यातच त्या नदीत बुडत असणारा एक विंचू त्या पाण्यातून त्यांच्या ओंजळीत आलेला त्यांना दिसला. ओंजळीतील पाणी ओघळून गेल्याबरोबर त्या विंचवाने रामकृष्णांच्या हातांना दंश केला. लगेचच त्यांनी वेदनेने हात झटकला आणि विंचू नदीत पडून बुडायला लागला. त्याला बुडताना पाहून रामकृष्णांनी पुन्हा एकदा त्याला ओंजळीत घेतले आणि पुन्हा विंचवाने त्यांना दंश केला. पुन्हा त्यांनी वेदनेने हात झटकला. विंचू पाण्यात पडला. पुन्हा एकदा रामकृष्णांनी त्याला वाचविले. हे सारे पाहणारा एक माणूस त्यांना म्हणाला, महाराज, जो विंचू तुम्हाला वारंवार दंश करतो, त्याचा जीव तुम्ही का वाचवू पाहता? मरु दे ना त्याला पाण्यात बुडून! हे ऐकून रामकृष्ण उत्तरले, दंश करणे हा विंचवाचा धर्म आहे तर विंचवाचा जीव वाचविणे हा माझा धर्म आहे.
कथा उपदेश : परोपकार हाच साधुचा धर्म असतो. जीव घेणार्‍याचा जीव वाचविणे हाच तो धर्म होय.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: