Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लिंब येथील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 31 : लिंब, ता. सातारा येथील रेखा दिलीप जमदाडे (वय 55) या महिलेचा स्वाईन फ्लू झाल्याने उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवसामध्ये दोन महिलांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
जमदाडे या गेल्या आठवड्यापासून आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पण्ण झाले होते. त्यामुळे त्यांनाउपचारासाठी तेथून बुधवारी दि. 30 रोजी दुपारी 4 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना मात्र बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
बुधवारी दिवसभरात जिल्हा रुग्णालयात एकही स्वाईन फ्लू बाधीत रुग्ण दाखल नव्हता. स्वाईन फ्लू संशयास्पद मात्र 18 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांचे घशाचे व नाकाचे नमुने घेण्यात आले असून त्याचे अहवाल आलेले नाहीत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: