Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

शहरी आणि खेडवळ
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: vc1
एका शेतातल्या उंदराने शहरवासी मित्राला आपल्या घरी जेवायला बोलविले. शहरी मित्राने कुतूहलाने ते आमंत्रण स्वीकारले पण जेवणाचे पदार्थ म्हणजे नुसती धान्येच होती. ते पाहून शहरी उंदीर म्हणाला, ‘मित्रा, तू अगदी साध्या किड्यामुंगीसारखा जगतोस असं दिसतं. तू आता माझ्याबरोबर शहराकडे चल. तिथं सगळे चांगले पदार्थ आहेत. आपण दोघं मिळून ते खात जाऊ.’ त्याप्रमाणे ताबडतोब ते दोघे शहरात गेले. शहरी उंदराने त्या खेडवळ उंदराला पाव, खवा, सुकामेवा, शेंगा, साखर आणि फळफळावळ दाखविली. ते पाहून खेडवळ उंदीर अगदी दीपून गेला. त्याने आपल्या मित्राच्या भाग्याची स्तुती केली आणि स्वत:च्या कमनशिबाबद्दल त्याला वाईट वाटले. ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात दार वाजले. त्याबरोबर ते दोन छोटे जीव इतके घाबरले, की ते एका फटीत लपले. जरा वेळाने ते परत सुक्यामेव्याला तोेंड लावणार तोच पुन्हा दुसरे कोणीतरी त्या खोलीत आले आणि पुन्हा ते दोघेजण जीव घेऊन आपल्या बिळात शिरले. मग मात्र उपाशी राहावे लागले तरी चालेल पण आपलंच घर बरं असा त्या खेडवळ उंदराने निश्‍चय केला. ‘राम राम मित्रा!’ तो उसासा टाकून म्हणाला, ‘मला आपलं माझं ते कच्चं धान्यच बरं वाटतं.
कथा उपदेश : भीतीयुक्त श्रीमंती जीवनापेक्षा शांततामय आणि साधे गरिबी जीवन चांगले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: