Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
घरातून मेहुण्यानेच लांबवले पाच लाख
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 8 : एका घरातून झालेल्या पाच लाख रुपयांच्या चोरीचा छडा शाहूपुरी पोलिसांनी लावला असून यामध्ये तक्रारदाराच्या मेहुण्यानेच घरातील पाच लाख रुपयांवर डल्ला मारल्याचे पुढे आले आहे. मेहुण्याकडून रोख दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मेहुण्याचे नितीन मुरलीधर कदम (वय 27, रा. महादरे ता. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी गणेश जगन्नाथ साळुंखे (रा. प्रतापगंज पेठ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साळुंखे यांच्या घरातून रोख 5 लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात   दाखल झाली होती. ही घटना दि. 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या दरम्यान घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर नितीन कदमला ताब्यात घेतले. कदम साळुंखे यांचा मेहुणा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर
आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: