Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवथर येथील दोन गटातील राड्यात दहा जणांना अटक
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 8 :शिवथर, ता. सातारा येथे गणेशोत्सवादरम्यान फटाके पेटवण्याच्या कारणातून दोन गटात राडा झाला होता.  त्यानंतर एका गटाने दुचाकीला फटाके लावून ती जाळल्याची घटना घडली होती. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून माहिती देण्यात आली. अक्षय राजेंद्र साबळे, विशाल दिलीप साबळे, सागर संजय साबळे, सुबोध संतोष साबळे, नीलेश बाबूराव साबळे, निखिल शंकर साबळे, प्रतीक राजू पोतेकर, जयेश मुरलीधर साबळे, सागर संदीप साबळे, शुभम शालीवानसाबळे (सर्व रा. शिवथर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: