Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लाडेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: re3
5पुसेसावळी, दि. 8 : लाडेगाव, ता. खटाव येथील मयूर दिलीप पवार या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर दिलीप पवार (वय 19, मूळ गाव बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली, सध्या रा. लाडेगाव, ता. खटाव) याचे वडील मजुरी कामानिमित्त महाड (महाबळेश्‍वर) येथे असतात. तो तिसरीपासून आत्याजवळच वास्तव्यास होता. सध्या तो बारावीच्या वर्गात पुसेसावळी येथे शिकत होता. शुक्रवारी दुपारी शाळेतून घरी आल्यावर जेवण केले व बाहेरून येतो, असे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर त्याने लाडेगाव बेघरवस्तीतील राहत्या घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या बाबतची फिर्याद रमेश नारायण शिंदे यांनी दिली आहे. आत्महत्येची नोंद पुसेसावळी दूरक्षेत्रात झाली असून हवालदार फिरोज मुल्ला तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: