Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

उपमन्यू
ऐक्य समूह
Saturday, September 16, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: vc1
महर्षी धौम्य ॠषींनी आपल्या दुसर्‍या शिष्याची उपमन्युची परीक्षा घेतली. त्यांनी त्याचा आहार बंद केला. माधुकरी मागून आणल्यानंतर गुरूने त्याला काही दिले नाही. नंतर तर माधुकरी घ्यायलाही जाऊ दिले नाही. तो गाईचे दूध प्यायला गेला तर गुरूने त्याला मानाई केली. नतंर उपमन्युने वासरांचे दूध पिऊन झाल्यावर त्याच्या तोंडाचा जो फेस गळत असे तो प्राशन करायला सुरूवात केली. पण गुरूने त्यालाही बंदी घातली. नंतर उपमन्युने रूईच्या झाडाची पाने खाल्ली त्यामुळे त्याची दृष्टी गेली. त्यामुळे तो चालता चालता विहिरीत पडला. धौम्या ॠषी त्याला शोधत तिथे आले. त्याला त्यांनी देव वैद्य अश्‍विनीकुमारांची स्तुती करायला सांगितली. अश्‍विनीकुमार प्रकट झाले. त्यांनी उपमन्युला भोजन दिले. पण त्याने गुरूच्या आज्ञेशिवाय भोजन खाल्ले नाही. तेव्हा गुरू प्रसन्न झाले व अश्‍विनीकुमार यांनी उपमन्युला दुष्टीही दिली व सर्व विद्याही दिल्या.
कथा उपदेश : गुरूने घेतलेल्या शिष्याच्या परीक्षेत तो पास झाला की विद्या प्राप्त होतात.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: