Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

शक्तिमान
ऐक्य समूह
Saturday, September 23, 2017 AT 11:47 AM (IST)
Tags: vc1
सूर्य आणि वारा यांच्यात एकदा आपल्या शक्तीविषयी वाद जुंपला. दोघेही आपण सर्वात जास्त सामर्थ्यशाली असल्याचे पटवून देत होते. शेवटी रस्त्यावरून जाणार्‍या एका वाटसरूच्या अंगावरील घोंगडी बाजूला काढून ठेवण्यास जो भाग पाडेल तोच खरा पराक्रमी समजावा असे ठरले. प्रथम वार्‍याने जोराने वाहून ती घोंगडी उडविण्याचा प्रयत्न केला पण थंडी वाजायला लागल्यामुळे वाटसरू ती अधिकच घट्ट धरू लागला. शेवटी वारा दमला. मग सूर्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली. त्यामुळे उकडायला लागून वाटसरूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्याने ती घोंगडी काढून ठेवली व तो सावलीत जाऊन बसला.

कथा उपदेश : नुसत्या शक्तीचा काहीच उपयोग होत नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: