Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

शक्तीवर युक्तीने मात
ऐक्य समूह
Wednesday, October 04, 2017 AT 11:45 AM (IST)
Tags: vc1
राजधानीचं शहर, दुथडी भरून वाहणारी नदी. विस्तीर्ण नदीकाठ. तिथं एका मोठ्या झाडावर एक कावळा-कावळी राहत होती. अंडी झाडाच्या ढोलीत ठेवून दोघं अन्न मिळविण्यासाठी बाहेर जात. ते परत येईपर्यंत त्यांची अंडी नाहीशी होत. दोन-तीन वेळा असं झाल्यावर एकदा त्या दोघांनी लपून बसून लक्ष ठेवले तर झाडाखालील एका बिळातून एक साप येऊन ती अंडी पळवत असलेला त्यांना दिसला. त्या मोठ्या सापापुढे या दोघांचा कसा निभाव लागणार? त्यांनी ही हकीगत त्यांचा मित्र असलेल्या कोल्ह्याला सांगितली. कोल्ह्याने त्यांना एक युक्ती सांगितली. दुसर्‍या दिवशी राजकन्या नदीवर आंघोळ करण्यासाठी लवाजम्यासह आली. तिचे दागिने दासींनी काठावर काढून ठेवले. कावळ्याने त्यातील एक हार उचलला आणि तो त्याने सापाच्या बिळात नेऊन टाकला. दासींनी ते पाहिल्यावर आरडाओरडा केला. सैनिक धावत आले. त्यांनी ते बीळ खणून काढले तेव्हा त्यांना मोठा साप दिसला. त्यांनी त्या सापाला ठार मारले व तो हार ते घेऊन गेले. कावळा-कावळी हे पाहून आता निश्िंचत झाले.

कथा उपदेश : शक्तीवर युक्तीने मात करा.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: