Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काळेवाडी येथे वीज पडून दोन मेंढरे ठार
ऐक्य समूह
Thursday, October 05, 2017 AT 11:45 AM (IST)
Tags: re4
5दहिवडी, दि. 4 :काळेवाडी, ता. माण येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वीज पडून दोन मेंढरे जागीच ठार झाली तर मालक नवनाथ सीताराम काळे हे बेशुद्ध पडले. त्यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
बुधवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच तलाठी श्याम सूर्यवंशी यांनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत सविस्तर वृत्त असे, काल सायंकाळी 5 वाजता काळेवाडी येथील देवकता शिवारात नवनाथ काळे हे मेंढरं चारत असताना अचानक वीज पडली. त्यामध्ये दोन मेंढरे जागीच ठार झाली. विजेच्या झटक्याने काळे बेशुद्ध पडले. त्यांना लोकांनी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर ते ठीक झाल्यावर त्यांना सोडण्यात आले. त्यांच्यावर डॉ. हणगंडी यांनी उपचार केले. सर्वसामान्य कुटुंबातील काळे आहेत. त्यांना शासकीय मदत तातडीने मिळावी, अशी मागणी होत आहे

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: