Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

निर्भय
ऐक्य समूह
Thursday, October 05, 2017 AT 11:48 AM (IST)
Tags: vc1
भावाची प्रकृती बिघडल्याचा निरोप गणपतला मिळाला तेव्हा तिन्हीसांजा उलटून गेल्या होत्या. त्या काळी विजेचे दिवे नव्हते. गणपत कंदील घेऊन गावी निघाला. गावाची वाट जंगलातून जाणारी होती. सभोवताली किर्रर्र काळोख पसरला होता. त्यामुळे वातावरण जास्तच भीषण झाले होते. रस्ता निर्मनुष्य. इतक्यात एक झाडाची फांदी पडली. गणपत घाबरला आणि एका झाडावर आदळला. त्यामुळे कंदील पडला आणि फुटला. घाबरत गणपत उठला. त्याला चालण्याची चाहूल लागली. गणपतला वाटले भूतच आहे. त्यामुळे तो किंचाळला. किंचाळलेला आवाज ऐकून चालणारा माणूस पुढे आला पण तो पांगळा होता. त्याच्या कुबड्यांचा तो आवाज होता, ते काही भूत नव्हते. त्या पांगळ्याने गणपतला विचारले, एवढ्या अंधारात कुठे निघालात? गणपतला हा आवाज एका माणसाचा आहे हे कळले आणि तो एकदम शांत झाला. त्याची भीतीच पळाली. तो निर्भय झाला आणि त्याने पांगळ्याचा हात हातात घेतला आणि चालू लागला. परमेश्‍वराच्या रूपाने तो पांगळा गणपतला भेटला. कारण त्याचा पांगळेपणा गणपतला जाणवलाच नाही. उलट त्याचा भरभक्कम आधारच वाटला. म्हणून परमेश्‍वर सतत सांगाती असतो ही भावना मनात रुजवली की कायम त्याची साथ मिळेल आणि आपण निर्भय बनू.
कथा उपदेश : निर्भय बनून परिस्थितीचा सामना करा.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: