Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा आज वाढदिवस
ऐक्य समूह
Friday, October 06, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 5 - न्यू फलटण शुगर वर्क्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त रिक्रिएशन क्लब, साखरवाडी येथे सकाळी 10 वाजता महाआरोग्यशिबिर आणि सायंकाळी 6 वाजता ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे.
महाआरोग्य शिबिरात बाल-रोग, स्त्रीरोग, हृदयरोग, कान-नाक - घसा तज्ज्ञांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. साखरवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
तसेच सायंकाळी रिक्रिएशन क्लब, साखरवाडी येथे आयोजित ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन न्यू फलटण शुगरचे कार्यालय अधीक्षक सुधीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. 
उद्या, दि. 6 रोजी सकाळी देवदर्शन झाल्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या सुरवडी, ता. फलटण येथील ‘मनीषा’ या निवासस्थानी प्रल्हादराव साळुंखे-पाटील शुभेच्छा स्वीकारणार
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: