Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

क्रिया-प्रतिक्रिया शाश्‍वत नियम
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:39 AM (IST)
Tags: vc1
एक मुलगा जंगलात गेला होता. चहुकडे निर्जन, उजाड जंगलात हवा व झाडांचाच आवाज येत होता. तो मुलगा घाबरुन ओरडला, ‘भूत’. तेव्हा त्याचा आवाज डोंगरांवर आदळून परतला व त्यास ‘भूत’ असे ऐकू आले. मुलाला वाटले की खरंच भूत आहे. तो हाताच्या मुठी आवळत जोराने ओरडला की, ‘तू मला खाशील’ डोंगरावर आदळून त्याचा आवाज परतला व त्याला वाटले की भूत मला विचारत आहे. तेव्हा तो म्हणाला, ‘हो मी तुला खाईल’ हा आवाज त्याच्यापर्यंत आला तेव्हा मुलगा घाबरुन घरी गेला व त्याने आईला सर्व गोष्ट सांगितली. आईने वस्तुस्थिती जाणून घेत सांगितले की, आता जंगलात गेल्यावर तू त्या भूताला सांग की, माझ्या मित्रा मी तुझ्यावर प्रेम करतो. पुन्हा जेव्हा मुलगा जंगलात गेला तेव्हा ओरडला, ‘माझ्या जीवलग मित्रा’ डोंगरांवर आदळून त्याच शब्दांचा प्रतिध्वनी ऐकू आला आणि  भूत  आपल्याला घाबरवीत नाही, असे त्याच्या लक्षात आले. नंतर तो म्हणाला, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ डोंगरावर आदळून हेच शब्द परत आले व मुलाच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
कथा उपदेश : क्रियाची प्रतिक्रिया निसर्गाचा एक शाश्‍वत नियम आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: