Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इंदोली फाटा येथे उभ्या असलेल्या वाहनाला टेम्पोची धडक
ऐक्य समूह
Tuesday, October 10, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: re2
अपघातात टेम्पोचालकासह दोन जण जागीच ठार
5उंब्रज, दि. 9 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इंदोली फाटा(ता. कराड गावचे हद्दीत भरधाव वेगात जाणार्‍या आयशर टेम्पोची महामार्गाकडेला उभ्या असणार्‍या अज्ञात वाहनाला पाठीमागून भीषण धडक बसली. यामध्ये आयशर टेम्पोचा चालक व अन्य 1 जण असे रायगड जिल्ह्यातील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवार, दि. 9 रोजी पहाटे 5 च्या सुमारास उघडकीस आली.
शांताराम यशवंत शिंदे (वय 35, रा. घोडगाव, जि. रायगड) व संजय सीताराम मोहिते (वय 48, रा. पळसगाव, जि. रायगड) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की राष्ट्रीय महामार्गावरून सातारा ते कोल्हापूर कोंबड्यांची पिल्ले घेऊन भरधाव जाणार्‍या आयशर टेम्पोने (क्र. एम. एच. 06. एचजी 4953) महामार्गाच्याकडेला उभ्या असणार्‍या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की टेम्पोचे केबिन पूर्णपणेउद्ध्वस्त होवून त्यात टेम्पोचा चालक शांताराम शिंदे व प्रवासी संजय मोहिते हे दोघेजण अडकले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती उंब्रज तसेच महामार्ग पोलीस व देखभाल दुरुस्ती विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा यांच्या-सह अन्य कर्मचार्‍यांना समजताच त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेवून मदत कार्यास सुरूवात केली.  यावेळी उंब्रज पोलिसांची क्रेन बोलावून टेम्पोचा पुढील भाग ओढण्यात आला व आतमध्येअडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. 
त्यानंतर महामार्ग देखभाल विभागाच्या रूग्णवाहिकेतून त्यांना उप-जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची नोंद करण्याचे काम उंब्रज पोलिसात सुरू होते. त्यामुळे अधिकचा तपशील समजू शकला नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: