Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘चक्काजाम’मुळे मालवाहतुकीवर परिणाम वाहतूकदारांचे दोन हजार कोटींचे नुकसान
ऐक्य समूह
Tuesday, October 10, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : ‘जीएसटी’, डिझेलच्या वाढत्या किमती, पोलीस आणि आरटीओकडून होणारी लूट आणि केंद्र सरकारच्या टोल धोरणाच्या निषेधार्थ देशातील वाहतूकदारांनी सुरू केलेल्या दोन दिवसीय ‘चक्काजाम’ आंदोलनाच्या पहिल्याच दिवशीसोमवारी देशभरातील मालवाहतूक ठप्पझाली. या आंदोलनामुळे वाहतूक-दारांचे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा अंदाज वाहतूक-दारांची राष्ट्रीय संघटना ‘एआयएमटीसी’ने वर्तवला आहे. दरम्यान, या आंदोलनातून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या आहेत.
आपल्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने दोन दिवसीय प्रतीकात्मक ‘चक्काजाम’ आंदोलन सोमवारी सुरू केले. देशात ठिकठिकाणी वाहतूकदारांनी मोर्चे काढून सरकारी अधिकार्‍यांना निवेदने दिली. या संपामुळे वाहतूकदारांचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे ‘एआयएमटीसी’चे चेअरमन बालमलकिसिंग यांनी सांगितले. या आंदोलनानंतरही सरकारने आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर दिवाळीनंतर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय ‘एआयएमटीसी’ने घेतला आहे. या संघटनेचे देशभरात 93 लाख ट्रकचालक-मालक आणि 50 लाखांहून अधिक खाजगी बसवाहतूकदार सदस्य आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: