Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लष्करात भरती करतो म्हणून धामणेरच्या तरुणाची फसवणूक
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: re1
5रहिमतपूर, दि. 12 : धामणेर, ता. कोरेगाव येथील किशोर नारायण क्षीरसागर या तरुणास लष्करात भरती करतो, असे सांगून एक लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद या तरुणाने रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
याबाबत माहिती अशी, किशोर क्षीरसागर हा आपल्या कुटुंबा-समवेत धामणेर येथे राहतो. पदवीधर झाल्यानंतर तो लष्कर भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याची ओळख सूरज अरुण शेडगे व सोमनाथसदाशिव भोसले (दोघे रा. शिरंबे, ता. कोरेगाव) यांच्याशी झाली. तुला लष्करात भरती करतो. त्यासाठी तू आम्हाला 2 लाख 50 हजार रुपये दे. आम्ही तुझे काम करतो, असे या दोघांनी सांगितले. दरम्यान किशोर क्षीरसागरने सोमनाथ भोसले यास वेळोवेळी 1 लाख 15 हजार रुपये दिले. त्यातील 15 हजार रुपये मित्राद्वारे परत केले; परंतु उरलेली 1 लाख रुपयांची रक्कम देण्यास सोमनाथ भोसले व सूरज शेडगे हे टाळाटाळ करत
आहेत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची फिर्याद किशोर क्षीरसागरने रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. हवालदार एम. ए. कुलकर्णी तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: