Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नोटाबंदीच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेस चौघांकडून आठ लाखांचा गंडा
vasudeo kulkarni
Friday, October 13, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: re3
5वाई, दि. 12 ः नोटाबंदीच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेतून यूपीआय मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून, बँक खात्यात पैसे शिल्लक नसताना ई-ट्रान्झॅक्शन करून बँकेची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध शाखा व्यवस्थापक सुनील वानखेडे यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 13 जानेवारी ते 18 जानेवारी 2017 या कालावधीत पूजा रवींद्र गायकवाड व रवींद्र नारायण गायकवाड (रा. फणसेवाडी, नांदगणे, पो. वयगाव, ता. वाई), राजेश बुधखले (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व सुप्रिया गजानन ठोमसे (पत्ता माहिती नाही) यांनी संगनमतकरून पूजा व रवींद्र गायकवाड यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाई शाखेतीलखात्यात रक्कम शिल्लक नसताना यूपीआय मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा (महा-यूपीआय) वापर करून राजेश बुधावले व सुप्रियाठोमसे यांनी पैशांची मागणी करून आणि ती मागणी स्वीकारून बँकेची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद शाखा व्यवस्थापक सुनील वानखेडे यांनी दिली. या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे तपास करत आहेत.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: