Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वृध्देची बँक खात्यातील रक्कम लांबवणार्‍या भामट्यास अटक
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: lo2
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
5सातारा, दि. 12  ः  एसबीआय बँकेतून बोलत असल्याचा बनाव करुन वृध्द महिलेच्या  बँक एटीएम पिनची माहिती मागवून 50 हजार रुपये एटीएममधून लंपास करणारा भामटायुसूफ साहेबजान अन्सारी (रा. बगरुडिह, ता. करमाटांड, जि. जामतारा, झारखंड) यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील एका वृध्द महिलेस दि. 2 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. त्यावरील अज्ञात व्यक्तीने स्टेट बँक ऑफ इंडिया-मधून बोलत असल्याचे भासवले.  फिर्यादीचे बँक खाते बंद करण्यात आले असून ते पूर्ववत सुरु करण्यासाठी आधार कार्ड व तुमचे एटीएम कार्ड वरील नंबर सांगा असे सांगून लबाडीने फिर्यादीचा एटीएम कार्डवरील नंबरची माहिती मिळवली. या माहितीद्वारे संगणकीय प्रणालीचा वापर करुन फिर्यादीच्या बँक खात्यावरील एकूण 49 हजार 900 रुपये एवढी रक्कम तोतयागिरी करुन काढून घेवून फसवणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी तपासाची सूत्रे गतिमान केली. सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि जी. एस. कदम यांच्या पथकामार्फत प्राप्त माहितीचा तंत्रशुध्द पध्दतीने तपास करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदारांनी मिळून गुन्हा केल्याची माहिती मिळवली. त्यानुसार घनवट, जी. एस. कदम, महेश शेटे, शंकर सावंत, सचिन पवार, विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, वर्षा खोचे आदींनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेवून आरोपी युसूफ अन्सारी यास अटक केली.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: