Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

निश्‍चय
ऐक्य समूह
Friday, October 27, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: vc1
पेशवाई काळातील गोष्ट. एका सावकाराकडे राम नावाचा एक मुलगा घरकामाला होता. तो वयाने जवळजवळ 12 वर्षांचा असेल पण निरक्षरच होता. एकदा तो सावकार बाहेरून परत आला. लगबगीने रामने तांब्याभर पाणी घेतले आणि तो मालकांच्या पायांवर घालू लागला. सहज त्याचे लक्ष मालकाच्या कानांकडे गेले. तो पाहातच राहिला. कानात सोन्याची भिकबाळी होती पण तिच्याकडे पाहत राहिल्याने तांब्यातील पाणी मालकाच्या पायांऐवजी भलतीकडेच पडू लागले. ते खेकसले, ‘राम्या, लक्ष कुठे आहे तुझे?’ राम दचकला. म्हणाला, ‘धनी, मला तुमच्यासारखी सोन्याची भिकबाळी मिळेल का कधी?’ ते ऐकून सावकार जोराने हसला. म्हणाला, ‘राम्या, लेका भिकबाळी कोणालाही मिळत नसते. त्याला विद्वान, श्रीमंत असावं लागतं. तू दोन्हीही नाहीस. उगाच नाही ती स्वप्नं पाहू नकोस.’ रामला ते बोलणे लागले. त्याचे स्वभिमानी मन दुखावले. त्याने मनाशी निश्‍चय केला. तो काशीला गेला. तिथे बारा वर्षे शिक्षण घेऊन विद्वान बनला. श्रीमंतही झाला. हा राम म्हणजे पेशव्यांचे सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे.
कथा उपदेश : निश्‍चयाचे बळ । तुका म्हणे तेची फळ। कोणतेही काम जिद्दीने करा. यश तुमचेच आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: