Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

हर्षशोक
ऐक्य समूह
Saturday, October 28, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: vc1
भारतीय युद्धामध्ये घटोत्कचाला मरण आले. पांडवांकडील सगळे रडू लागले. फक्त भगवान श्रीकृष्ण तेवढे प्रसन्न होते. पुन्हा पुन्हा आपला आनंद प्रगट करून ते अर्जुनाची पाठ थोपटीत होते. श्रीकृष्णाला एवढे प्रसन्न पाहून अर्जुन म्हणाला, “अरे मधुसूदना! घटोत्कच केवढा महावीर होता. तो मेला म्हणून सारे पांडव व त्यांची सेना शोकाकुल झाले आहेत आणि तू मात्र प्रसन्न आहेस. याचे कारण काय?” श्रीकृष्ण म्हणाले, “अर्जुना ! आज खरोखर आनंदाचा प्रसंग आहे. घटोत्कच मेला हे खरे पण माझा प्राणप्रिय अर्जुन वाचला यात शंका नाही. अरे, कर्णापाशी कवचकुंडले होती. इंद्राने ती मागून नेली पण जाताना त्याने कर्णाला एक भयंकर शक्ती दिली. ती शक्ती त्याच्याजवळ असेपर्यंत त्याला कोणी मारू शकत नव्हते. इतकेच नव्हे तर ती शक्ती वापरून तो तुझा वध करणार होता. ती शक्ती घटोत्कचावर वापरल्याने तो मेला पण तू वाचलास. आता कर्णाला मारणे कठीण नाही.”
कथा उपदेश : मानवी जीवनातील घटना मंगल व अमंगल मिश्रित असतात. म्हणून कोणतीही घटना घडली तरी एकदम सुखी वा दु:खी होऊ नये.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: