Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

आश्रय
ऐक्य समूह
Thursday, November 02, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: vc1
एका माणसाला एकदा सापाचं पिल्लू मिळालं. त्यानं ते घरी आणलं व तो त्याची देखभाल करू लागला. त्याला बांबूचं नळकांडं करून दिलं. त्यात गवत वगैरे घालून त्याच्या राहण्याची सोय करून दिली. त्याला खाण्यापिण्याची व्यवस्था करून दिली. एकदा एक साधू तिथं आला. त्यानं हे पहिलं व तो त्या माणसाला म्हणाला, “हे काय करतोस भलतंच तू ! भलत्यावर प्रेम करून त्याला आश्रय देणं धोक्याचं आहे. उद्या तुझ्यावर जीवित गमावण्याची वेळ येईल. तेव्हा वेळीच सावध हो आणि हा नाद सोडून दे.” त्या माणसावर या उपदेशाचा काही परिणाम झाला नाही. एकदा काही कारणानं तो माणूस दोन दिवस बाहेरगावी गेला होता. तेथील सारी कामे आटोपून तो घरी परतला. आल्यावर त्यानं आपल्या लाडक्या सापाला हाक मारली. तो बाहेर येईना म्हणून त्याच्या घरात हात घातला. त्याबरोबर त्या सापानं दंश केला वत्या माणसाला प्राण गमवावे लागले.

कथा उपदेश : दुष्टाला आश्रय देऊ नये.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: