Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्टेट बँकेच्या कर्ज व्याजदरात कपात
ऐक्य समूह
Friday, November 03, 2017 AT 11:07 AM (IST)
Tags: na1
गृह, वाहन कर्ज सर्वात स्वस्त
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने गृह आणि वाहन कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर 8.35 टक्क्यांवरून 8.30 टक्के तर वाहन कर्जाचा व्याजदर 8.75 टक्क्यांवरून 8.70 टक्के झाला आहे. देशातील बँकिंग क्षेत्रात हा सर्वात कमी व्याजदर आहे.
स्टेट बँकेच्या व्याजदरातील कपातीनंतर इतर बँकाही व्याज-दर कपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
बँकांनी हा निर्णय घेतल्यास ग्राहकांना आणखी दिलासा मिळेल. या कपातीनंतर स्टेट बँकेच्या गृहव वाहन कर्जाचे व्याजदर सर्वांत कमी आहेत. नवीन व्याजदर हे 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत, असे स्टेट बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आता एक वर्षाच्या कर्जासाठी 7.95 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.
यापूर्वी हा दर आठ टक्के होता. एका दिवसाच्या कर्जासाठी
बेंचमार्क लेंडिंग दर (एमसीएलआर) घटवून 7.70 टक्के करण्यात
आला आहे. या पूर्वी हा दर 7.75 टक्के होता. तीन वर्षांच्या कर्जाचा व्याजदर 8.10 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तीन वर्षांच्या कर्जासाठी 8.15 टक्के व्याजदर आकारला जात होता. रजनीशकुमार यांनी स्टेट बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर लगेचच नवे व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: