Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सीआरपीएफच्या वाहनावर गोळीबार
ऐक्य समूह
Friday, November 03, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: na2
पाच जवान जखमी
5श्रीनगर, दि. 2 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात  दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर गुरुवारी केलेल्या गोळीबारात पाच जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील लाझीबल येथे सकाळी साडेआठच्या सुमारास दहशत-वाद्यांनी सीआरपीएफच्या 96 व्या बटालियनच्या बसवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले आहेत. 
त्यातील तीन जवान थेट गोळ्या लागून जखमी झाले असून इतर दोन जवान वाहनांच्या फुटलेल्या काचा लागून जखमी झाले आहेत. या आधी 2 ऑक्टोबरला ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर पहाटेच्या सुमारास हल्ला केला होता. श्रीनगर विमानतळ आणि त्या जवळचा परिसर संवेदनशील आहे. या छावणीत सीमा सुरक्षा दलाची शस्त्रास्त्रे व दारूगोळा साठवला जातो. या भागात हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: