Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

संगीत
ऐक्य समूह
Wednesday, November 08, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: vc1
एके दिवशी बादशहा अकबर संगीतसम्राट तानसेनला म्हणाले, ‘आपण संगीतातले जणू शिखर आहात. आपल्याला हे संगीत शिकवलं कुणी? तुझ्या गुरूचं गाणं ऐकायचं आहे.’ तानसेन म्हणाले, ‘त्याचं गाणं ऐकायला तर बादशहा आपल्याला तिथंवर जावं लागेल.’ तानसेन व अकबर यमुनातीरावरच्या एका झोपडीपाशी रात्रीच्या अंधारात पोहोचले. पहाटे तानसेनांचे गुरू स्वामी हरिदास गाऊ लागले. त्यांचं गाणं केवळ दिव्य होतं. दोघ नि:शब्द होऊन महालात परतले. बादशहा म्हणाले, ‘असं संगीत तुझ्या गळ्यातून का येत नाही’ त्यावर तानसेन उद्गारले ‘मी काही मिळविण्यासाठी गातो’ तर गुरुजींनी आधीच काही मिळविलेले आहे. गाणं हे माझ्याबाबतीत साधन आहे. त्यात ते पूर्ण भरून गेले आहेत आणि तेच दिव्य संगीताच्या रुपानं ओसंडून वाहत आहे. मला प्रसिद्धी, प्रतिष्ठा, संपत्ती हवी आहे. पण मलादेखील जेव्हा साध्य लाभेल तेव्हा मी सुद्धा हे साधन सोडेन.”
कथा उपदेश : काही मिळविण्याची आकांक्षा नसेल तर विशुद्ध कर्माचे फूल कारणाशिवाय उमलते. अंतर्यामातून वाहणार्‍या स्वामी हरिदासांच्या दिव्य संगीतासारखे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: