Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्षपद अपेक्षेप्रमाणे आ. शशिकांत शिंदे यांच्या सुपुत्रालाच
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 8 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आ. शशिकांत शिंदे यांचे सुपत्र तेजस शिंदे यांची नियुक्ती अपेक्षेप्रमाणे झाली आहे. आ. शिंदे यांच्या सुपुत्राने जिल्हा युवक अध्यक्षाच्या रूपाने राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. तेजस शिंदे यांच्या नियुक्तीचे पत्र दोन दिवसात मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राष्ट्रवादी जिल्हा युवकच्या अध्यक्षपदासाठी अनेक मातब्बर शर्यतीत होते. त्यामुळे हे पद कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. मदनराव पिसाळ यांचे नातू अ‍ॅड. विजयसिंह पिसाळ, आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक बाळू खंदारे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. त्यामध्ये तेजस शिंदे यांनी बाजी मारली आहे. 
सर्व नावांवर चर्चा करून राष्ट्रवादीचे विधिमंडळातील नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला कौल आ. शिंदे यांच्या सुपुत्राच्या बाजूने दिला आहे. तेजस शिंदे यांच्या रूपाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसला धडाडीचा नवा चेहरा मिळणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: