Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बारा वर्षांपूर्वीच्या कारणातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 8 : अजिंक्यतारा किल्ल्यावर झालेल्या खुनापाठीमागे 12 वर्षांपूर्वीचे कारण असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  दरम्यान, संशयित लवेश जाधव याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावर सोमवारी दुपारी लक्ष्मण माने या युवकाचा डोक्यात दगड घालून खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित लवेश याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे प्राथमिक तपास केला आहे.
तपासामध्ये लवेश याच्या मेहुण्याचा 2006 मध्ये मृत्यू झाला. मेहुण्याच्या मृत्यूस लक्ष्मण माने हा कारणीभूत असल्याचा संशय लवेश याच्यासह इतरांचा होता. त्या रागातून मानेचा खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: