Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोक्सो प्रकरणात आणखी आरोपीला पकडायचेय : सरकार पक्षाचा युक्तिवाद
ऐक्य समूह
Thursday, November 09, 2017 AT 11:14 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : पोक्सो प्रकरणात संशयित आरोपी आनंद पवार हा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांसह परराज्यात फिरला असून सातारा शहर पोलिसांचा केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातील तपास झालेला आहे. पोलीस तपासात महसूल अधिकारी अजित पवार यांना दोन नंबरचे संशयित आरोपी करण्यात आले असून अद्याप त्यांना अटक नसल्याने संशयित आनंद पवार याला जामीन देवू नये, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला.
 आनंद पवार (रा.आरफळ, ता.सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेवून अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दि. 10 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.  जिल्हा न्यायालयात संशयित आरोपी आनंद पवार याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी सुरू असून या जामीन अर्जावर बुधवारी दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद झाला. सुरुवातीला बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. आनंद पवारव मुलीमध्ये प्रेमसंबंध होते.
त्यामुळे आपआपसात संगनमत असल्याने त्यांना विवाह करायचा होता. मुलीवर इतर कोणाचाही दबाव नव्हता. त्यामुळे महसूल अधिकारी अजित पवार यांचाही या घटनेशी संबंध येत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. सरकार पक्षाने बचाव पक्षाचे मुद्दे खोडून काढत संशयित आनंद पवार याला जामीन होवू नये, असा युक्तिवाद केला. या प्रकरणात कोणाचा दबाव नसेल तर मग संशयित आनंद पवार व पीडित मुलगी एकत्र का हजर झाले नाहीत? पोलीस तपास अद्याप बाकी असून संशयिताला जामीन झाल्यास पोलिसांना तपासावर मर्यादा येतील. याबाबत पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: