Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

यशाला ‘शॉर्टकट’ नाही
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: vc1
आयुष्यात आपल्याला पुढे जायचे असेल, यशस्वी व्हावयाचे असेल तर भरपूर काबाडकष्ट, परिश्रम करण्याची तयारी हवी. यश तसे मिळत नाही. प्रतिभा म्हणजे दुसरं काही नाही. ‘नव्याण्णव टक्के घाम नि एक टक्का राम ।‘ असे म्हणतात. (जीनियस इज नाइन्टीनाइन परसेंट... पास्िंर्परेशन अँड वन परसेंट इान्िंस्परेशन) लेखनाची ढोरमेहनत, काबाडकष्ट यांना सीमा नसते. टॉलस्टॉयने
‘वॉर अँड पीस’सारखी जंगी कादंबरी सात वेळा नव्याने लिहिली आणि त्याच्या पत्नीने न कंटाळता सात वेळा तिची ‘फेअर कॉपी’ केली! रचना लिहून पुरी झाली, की लेखकाला उमजते - हे असे नाही, असे लिहिले जायला हवे होते. ‘रन्वाँ’ या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने म्हटले होते, ‘एखादी फिल्म मी पुरी करतो तेव्हा मला कळते ती कशी करायला हवी होती. (व्हेन यू फिनिश मेकिंग ए फिल्म, यू नो देन हाऊ यू शूड हॅव मेड इट)

कथा उपदेश : परिश्रमाला पर्याय नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: