Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘सुरुची’ राडा प्रकरणात टिपूच्या तीन साथीदारांना पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:10 AM (IST)
Tags: lo2
तिघेही पुण्याचे, दोन अट्टल गुन्हेगार
5सातारा, दि. 9 : ‘सुरुची’ राडा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी पुणे येथून टिपू उर्फ रिजवान सत्तार (वय 30, रा. ख्वाजा बिल्डिंग, हडपसर, पुणे) याच्या आणखी तीन साथीदारांना अटक केली आहे. त्यातील एकावर 7 आणि एकावर 3 गुन्हे दाखल आहेत. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची सुमीत सोपान पवार (वय 23, रा. मगरआळी, हडपसर, पुणे), मोहसीन जब्बार सय्यद (वय 22, रा. हडपसर, पुणे) आणि शंकर औंदुबर पडवळे (वय 22, रा. लोणी काळभोर, पुणे) अशी नावे आहेत. त्यातील सय्यदवर सात गुन्हे दाखल आहेत तर पडवळेवर तीन गुन्हे दाखल आहेत. हे दोघे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘सुरुची’ राडा प्रकरणात पुण्यातूनही मोठ्या प्रमाणावर गुंड आल्याची चर्चा होती. 
टिपूला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे तपास केला. त्यावेळी त्याने आपल्यासोबत असलेल्या तीन जणांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पुणे येथून आणखी संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: