Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आनंद पवारचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:06 AM (IST)
Tags: lo1
अजित पवारच्या अडचणीत वाढ
5सातारा, दि. 9 : पोक्सो प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आनंद पवार याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे या गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि रोजगार हमी योजनेचाउपायुक्त अजित पवार याच्यापुढील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
 आनंद पवार (रा.आरफळ, ता. सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेवून अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दि. 10 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.  जिल्हा न्यायालयात संशयित आरोपी आनंद पवार याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी  झाली. त्यावेळी सरकार पक्षाने बचाव पक्षाचे मुद्दे खोडून काढत संशयित आनंद पवार याला जामीन होवू नये, असा युक्तिवाद केला. या प्रकरणात कोणाचा दबाव नसेल तर मग संशयित आनंद पवार व पीडित मुलगी एकत्र का हजर झाले नाहीत? पोलीस तपास अद्याप बाकी असून संशयिताला जामीन झाल्यास पोलिसांना तपासावर मर्यादा येतील, असे सरकार पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: